Shevgaon : कोरोनामुळे गार ऊसाचा रस यावर्षी हद्दपार

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील एकेकाळी उन्हाळ्यात गारवा देणारा थंड ऊसाचा रस यावर्षी करोनामुळे तालुक्यातुन जणुकाय हद्दपार झाला आसुन यावर्षी लाँकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर संक्रात आली आसतांना गरीब सर्वसामन्याचे शितपेय म्हणून ओळखला जाणारा ऊसाचा रस या वर्षात कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावसह परिसरातील आनेक छोटे मोठे व्यवसायिक शेवगांव पांढरीपुल माहामार्गावर बैल रसवंती गृह चालवितात . काही व्यवसायिकांनी फेब्रुवारी दरम्यान रसवंती गृह उभारली तर काहींनी सुरूवातीला ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटका वाढल्यानंतर मार्च महिन्यात रसवंतीगृह चालू केले. परंतु, कोरोनाचा कहर वाढतच असल्याने प्रशासनाने २३ मार्चला लॉकडाऊन घोषित करून सर्वच उद्योग-व्यवसाय बंद केले. दोन महिन्यानंतर आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी चौथ्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योगधंद्यांना उघडण्यास सध्या परवानगी मिळाली आहे. मात्र यामध्ये रसवंतीगृहाचा समावेश नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा हंगाम आवरत आला तरी अद्यापही सुरू करता आलेला नाही.

ढोरजळगांव येथील शेतकरी निवृत्ती गि-हे यांनी बोलतांना सांगितले की जानेवारी जवळपास २५ ते ३० हजार रूपये खर्चून पाथडी येथुन रसवंतीसाठी लाकडी चरक आणुन बसवला होता. परंतु, बैल जुंपून चरक फिरण्याआधीच लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे लॉकडाऊन वाढतच गेल्याने रसवंती व्यवसायात हजारो रूपयांची गुंतवणूक करून उद्योग बंदच राहिल्याने रसवंतीगृह व्यवसायिक मात्र सध्या अडचणीत सापडले आहेत. यामुळे मोठी आर्थिक झळ बसली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here