जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे संघटनेचे गा-हाणे
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या आरोग्य सेवकांचे दोन महिन्यापासून वेतन व चारशे रुपयांचा दैनंदिन प्रवास भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत आरोग्य सेवकांच्या संघटनेकडून जिल्हा आरोग्य अधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन महिन्यापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रात्रंदिवस विविध चेकपोष्टसह इतरत्र कर्तव्य बजावत आहेत. तसेच प्रत्येक गावात जाऊन कोरोना विषाणूबाबत नागरीकांत जनजागृतीचे काम करीत आहेत.
मात्र, मागील दोन महिन्यांपासून आरोग्य सेवकांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून देण्यात येणारे वेतन मिळाले तर नाहीच, परंतू दैनंदिन प्रवास भत्ताही अद्याप दिलेला नाही. त्यामुळे आरोग्य सेवकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य सेवकांचे थकित वेतन व प्रवास भत्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
causing a mist to form inside the watch dial