Bhandara : Mandavi : प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी घेतला शून्य सावलीचा अनुभव

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्ययन-अनुभव देणाऱ्या जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, मांडवीच्या विद्यार्थ्यांनी तसेच नवोपक्रमशील शिक्षक दामोधर डहाळे यांच्या कुटुंबियांनी आज बुधवारी Local Noon अर्थात शून्य सावलीचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतला.

आपण सर्वच लहानपणापासून ऐकत आहोत की आपली सावली ही आपल्याला कधीच सोडत नाही. हे सत्यही आहे. पण जर काही वेळेपूरती सावली नसेल तर? याच शंकेचे निरसन करण्यासाठी तुमसर परिसरात आजचा दिवस हा पर्वणीच ठरला.

सूर्य हा कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही हे पडताळून बघायचे असेल तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे सावली पाहणे. जर एखादा पेला उलटा ठेवला तर त्याची लंबकृती सावली आपल्याला दिसेल. याचे कारण म्हणजे पृथ्वीने सूर्याभोवतीच्या मार्गासोबत तयार केलेला 23.5° चा कोन. पण जेव्हा सूर्य उत्तरायणामधून दक्षिणायनात प्रवेश करतो किंवा याउलट दक्षिणायनातून उत्तरायणमध्ये जातो. तेव्हा 23.5° दक्षिण ते 23.5° उत्तर या पृथ्वीच्या भागात अगदी काही क्षणासाठी सावली नष्ट होते. आता सावली नष्ट होते म्हणजे सूर्य पूर्णपणे आपल्या डोक्यावर असतो. यालाच Local Noon म्हणतात. आपण यास ‘शून्य सावलीचा दिवस’ असे संबोधतो. स्थानपरत्वे Local Noon चा दिवस व वेळ ही भिन्न-भिन्न असते.
आज ही सुवर्णसंधी तुमसर परिसरात जवळपास दुपारी 12.03 वाजतापासून ते 12.07 वाजेपर्यंत 2020 या वर्षाच्या Local Noon चा अनुभव घेता आला.

हा ‘शून्य सावलीचा दिवस’ जि.प.शाळा,मांडवीच्या समिक्षा ढबाले, योगेश्वरी ढबाले, तसेच गार्गी डहाळे, अश्मी तुमसरे, जान्हवी तुमसरे यांनी डहाळे सरांच्या उपस्थितीत त्यांच्या सूचनेनुसार व पालकांच्या सहकार्याने साधा ग्लास वापरून Local Noon अर्थात शून्य सावलीचा मनमुराद आनंद घेतला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here