Corona Effect: शेतमाल वाहतुकीसाठी एसटीची सुविधा

0

तोटा भरून काढण्यासाठी निर्णय ; ६०० बसस्थानकावरून सेवा

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

पुणे ः कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसून अडचणीत आले आहे. त्यावर मात करण्यासाठी महामंडळाच्यावतीने राज्यात एसटीचे बसचे ट्रकमध्ये रूंपातर करून शेतमाल वाहतूक सुरू केली जाणार आहे. राज्यातील सुमारे २५० आगारा अंतर्गत असलेल्या ६०० बस स्थानकावरून ही सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबतचे शासनाने नुकतेच परिपत्रक काढले असून त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एकूण १४ हजार ५०० एसटी बस आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार बसने महामंडळाने ठरवून दिलेल्या विहित आयुर्मान म्हणजेच दहा वर्षे व साडे सहा लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. या आयुर्मान पूर्ण केलेल्या बसचे रूंपातर ट्रकमध्ये करून या बसेस शेतमाल वाहतुकीच्या सेवेत दाखल होणार आहे. पॅकबंद ट्रक असल्याने आगामी पावसाळ्यात शेतकरी, व्यापाऱ्याकडून मालवाहतुकीला प्राधान्य मिळणार आहे. त्याप्रमाणे महामंडळाकडे
२७८ ट्रक असून त्यापैकी १५३ ट्रक हे बंदिस्त आहेत. उपलब्ध असलेल्या बंदिस्त ट्रकचे आयुर्मान तपासले असता २५ ट्रकचे आयुर्मान हे १० ते १५ वर्षे पर्यत आहेत.
त्यामुळे या बंदिस्त ट्रकचाही शेतमाल वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयाच्या पातळीवर विभाग नियंत्रण कक्ष स्थापन
स्थापन करण्यात येणार आहे.

राज्य महामंडळाच्या निर्णयानुसार एस टी बसला किलोमीटरमागे ४२.४ रूपये इतका खर्च येत होता. सध्या मालवाहतूकीसाठी २८ रूपये प्रति किलोमीटर
दर आकारून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचे नियोजन आहे. तरी एसटी बस ट्रकची वाहतूक क्षमताही ८-९ टनाची असल्याने वाहतुकीचा दर
निश्चित करून ही सेवा राज्यातील काही एसटी केंद्रावरून सुरू केली आहे. या निर्णयाचे स्वागत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून केले जात आहे, अशी माहिती महामंडळाच्या सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here