जालना: दिलासादायक…सव्वाशे संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

उदयकुमार गोयल । राष्ट्र सह्याद्री

जालना: जिल्ह्यातील सव्वाशे संशयीत रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून आज बुधवारी सकाळी निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामुळे जालना जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.जालना जिल्हा रुग्णालयातर्फे काल मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील सव्वाशे संशयीत रुग्णाच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यात जालना शहरातील मंठा चौफुलीजवल असलेल्या एका खाजगी रुग्णालयातील 47,जुना जालना भागातील एका प्रतिष्ठित हॉस्पिटल मधील 40,अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील 5,जालना कोविड केअर सेंटरमधील 5 ते 7 आणि मंठा तालुक्यातील काही संशयीत असे एकूण सव्वाशे संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे असे सरकारी सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जालना शहर व जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यातील जनतेत चिंता निर्माण झाली होती. मात्र आज जिल्ह्यातील जवळपास सव्वाशे संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जनतेसह जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेतील योध्याना मोठा दिलासा मिळाला असून पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची साखळीला देखील ब्रेक लागला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here