National : जय जवान : आतंकवाद्यांचा पुलवामा सारख्या हल्ल्याचा कट उधळला; आयईईडी ने भरलेली कार उडवली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा आतंकवाद्यांचा कट देशाच्या जवानांनी उधळून लावला. सुरक्षाबलाच्या जवानांनी आयईईडी ने भरलेली कार उडवून नष्ट केली. 

आज सकाळी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपोरामधील आयनगुंड गावातील एका रस्त्याच्या कड्याला ही कार लावण्यात आली होती. ही कार बेवारस अवस्थेत नजरेत आली. सुरुवातीला पोलिसांनी ही कार थांबवली असता गाडीतील ड्रायव्हरने कार पळवली नंतर एकेठिकाणी गाडी सोडून तो पोलिसांच्या गोळीबारातून बचावला व पळून जाण्यात यशस्वी झाला.

नंतर सेना, सीआरपीएफ आणि पोलीसांनी संयुक्त ऑपरेशन राबवून बॉम्ब स्कॉडच्या मदतीने सुरुवातीला आईईडीला कारच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण कारमधून हे निघत नसल्याने कारसहित या संपूर्ण आईईडीला नागरिवस्तीपासून लांब नेऊन त्याचा विस्फोट करून नष्ट करण्यात आले. या विस्फोटात कारचे चिथडे उडाले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here