Nashik : बाजार समितीचे कामकाज शुक्रवारपासून सुरू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नाशिक – बाजार समितीच्या पंचवटी मुख्य बाजार आवारात कोरोनासंक्रमित दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व बाजार समिती परिसर निर्जंतुक करण्यासाठी बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार २६ ते २८ मे दरम्यान ३ दिवस बंद होते.

अखेर स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाल्यानंतर बाजार समितीचे कामकाज आज (ता.२९) पासून सुरू होणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली. बाजार समितीचे व्यापारी, हमाल व मापारी वर्गाच्या संचालकांच्या अर्जावरून बाजार समिती प्रशासनाने हा निर्णय घेऊन पंचवटी मुख्य बाजार आवार व पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार आवारातील कामकाज बंद होते. अखेर खबरदारी घेऊन पुन्हा बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here