Ahmednagar : कोरोना बाधीत महिलेने दिला जुळ्यांना जन्म; माता आणि बाळ दोघेही सुरक्षित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर – कोरोना बाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाने या महिलेला गर्भधारणा झाली होती. त्यात माता आणि बाळ दोन्हीही सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे.

मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here