Jalana : अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कार्यवाही 4,50,000 रुपयाचा गुटखा व सुगंधीत तंबाखू जप्त !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

जालना – कोरोना संसर्ग आजाराचा प्रादुर्भावाच्या अनुषगांने सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉक डाऊनच्या आपत्तीचा काही साठे बाजार व काळा बाजार करणारे गेल्या काही दिवसापासून गैर फायदा घेत असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना यांच्या सुचनेवरून समानधान पवार यांनी त्यांचे गोपनिय खबरे कार्यान्वीत केले. अवैधरित्या गुटखा व सुंगधी तंबाखुची साठा व विक्री करणाऱ्यांची माहीती काढून आज पोलीस स्टेशन चंदनझिरा, सदर बाजार सह कदीम जालना हद्यीत छापा मारला. 

अमर रमेश जैन याचे अमर ट्रेडर्स व कन्हैय्या रमेश खेरुडकर याचे खेरुडकर ट्रेडर्स, नवीन मोंढा येथे छापा मारला असता 1,80,442/-रुपयाची सुंगधी तंबाखु मिळून आली असून जप्त करण्यात आली आहे.

राजेश रमेश खेरुडकर याचे विश्वनाथ ट्रेडर्स, जुना मोंढा येथुन 1,16,726/- रुपयाची सुंगधीत तंबाखू मिळून आल्याने जप्त करण्यात आली आहे. विश्वनाथ सोनाजी भुसारे, सोनल नगर, जुना जालना येथून 1,50,000/- रुपयाचा गोवा
व राज निवास गुटखा जप्त करण्यात आला आहे. नमुदचा गुटखा हा नामांकित गुटखा माफिया याचा असल्याचे समोर येत आहे.

याप्रमाणे एकूण 4,47,168/- रुपयाचा महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेला गोवा गुटखा, राज निवास व सुंगधी तंबाखू जप्त करुन पो. स्टे. चंदनझिरा, सदर बाजार व कदीम जालना येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील सर्व मुद्येमाल छापा मारुन जप्त करुन अन्न व सुरक्षा अधिकारी, जालना यांना लेखी कळवले आहे.

वर्षा रोडे, अन्न व सुरक्षा अधिकारी, जालना या जप्त मुद्येमालाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नमुदची कार्यवाही एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक, जालना यांनी पथकातील कर्मचारी पोकॉ/1444 प्रदीप घोडके, पोकॉ/1462 विशाल काळे, पोकॉ/578 ज्ञानेश्वर केदारे, पोकॉ/1461 शिवाजी डाखुरे यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here