Crime: नदीमची श्वास थांबला…तपास थांबू देऊ नका..!

रमजान ईद च्या दिवशी पोलीस चौकीसमोरच पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

कारवाई केल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही : कुटुंबीयांचा पवित्रा

टिळकनगर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील विवाहित तरुणाचा काल दुपारच्या सुमारास लोणी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रमजान ईदच्या दिवशी तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने
पोलीस चौकी समोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात तो गंभीर भाजला होता, त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र काल संध्याकाळच्या सुमारास नदीमची प्राणज्योत मालवली,
मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास मयत झालेल्या नदीम पठाणचा रात्री उशिरापर्यंत अंत्यविधी करण्यात आलेला नव्हता.

पोलिसांशी संबंधित नाजूक प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नदीमच्या कुटुंबाने मात्र आक्रमक पवित्रा घेतला असून नदीमचा श्वास थांबला पण पोलीस तपास थांबवू नका, या प्रकरणातील दोषी पोलिसाविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here