Kada : पोलिसांचा सायरन वाजताच, टग्यांनी मैदानातून धूम ठोकली

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी आदेश असतानाही एका महाविद्यालयाच्या परिसरात तोंडाला मुखपट्टी न लावता क्रिकेटच्या नावाखाली अस्लील भाषेत आरडाओरड करणा-या टग्यांनी पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजताच, मैदानातून अक्षरश: चड्ड्या फिटेपर्यंत पलायण करुन धूम ठोकली.

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यातच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रत्येक नागरीकाने जागृत राहून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सामाजिक भान नसलेले काहीजण परिस्थितीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे कडा परिसरात प्रशासनाकडून मिळालेल्या संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेऊन जमावबंदीचे सर्रास उल्लंघन होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून तोंडाला मुखपट्टी न लावताच अनेकजण भटकतात. तंबाखुजन्य पदार्थावर बंदी असूनही आंबट शौकिन गुटखा चगळीत रस्त्यावर थुंकत आहेत.

दुचाकीवर फिरणा-यांची संख्या वाढली आहे. मागील चारपाच दिवसापासून कड्यातील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज वीस- पंचवीस जणांच्या टोळके क्रिकेटच्या नावाखाली बेजबाबदारपणे एकत्र येत आहेत. सकाळ- संध्याकाळ अस्लील भाषेत आरडाओरड करीत टग्यांनी दहशत निर्माण केली होती. याबाबत त्रस्त नागरीकांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांकडून या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. गुरुवारी सायंकाळी अचानकपणे पोलिसांचे वाहन महाविद्यालयाच्या प्रांगणात सायरन वाजवत आले.

हातात काठ्या घेऊन जवान मैदानात उतरताच, टगेगिरी करणा-यांची चांगलीच पाचावर बसली. अन् काही क्षणातच  पार्श्वभागाला पाय लावून मोकाट टग्यांनी अक्षरश: घटनास्थळावरुन पोबारा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यापुढे विनाकारण जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेणा-यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here