Shrirampur : शनिवारचा पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवा; नागरिकांची नगरपालिकेकडे मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – कोरोनामुळे जनतेला वारंवार हात,पाय, तोंड धुवावे लागत आहे. तसेच पाण्याची सध्या टंचाई नसल्यामुळे नगरपालिकेने शनिवारी सुद्धा नळांना पाणी पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शहरातील विविध भागातील नागरिकांनी केली आहे. गेले पाच सहा आठवडे नगरपालिकेने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शनिवारी पाणीपुरवठा केला आहे. मात्र उद्या शनिवारी पाणीपुरवठा होणार नसल्याची सूचना सोशल मीडियावर नगर पालिके मार्फत फिरत आहे. याबाबत नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 
भंडारदरा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असून शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही तलाव सुद्धा भरलेले आहेत. त्या ही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सध्या सर्वत्र कोरोणाची साथ सुरू आहे. त्यामध्ये नागरिकांना वारंवार तोंड, हात धुवावे लागत आहे. त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत आहे. तरी नगरपालिकेने शनिवारी होणारा पाणीपुरवठा बंद न करता तो नियमित कायमस्वरूपी सुरू ठेवावा. अशी मागणी शहराच्या विविध भागातील नागरिकांनी केली आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या चिकनगुनियाच्या प्रादुर्भावामुळे शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात येत होता. परंतु आता ही साथ सुद्धा ओसरली आहे. तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्याची तीव्र आवश्यकता आहे.
शहराला पालिकेकडून नियमितपणे अखंड पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा नगरपालिकेने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारचा पाणीपुरवठा सुद्धा असाच सुरू ठेवावा आणि जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी मागणी सुद्धा नागरिकांनी विशेषत महिला वर्गातून करण्यात आली आहे. श्रीरामपूर नगरपालिका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून वर्षभर 365 दिवस पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका म्हणून पालिकेची ख्याती आहे. सध्या कोरोणाची साथ सुरू असल्यामुळे पाण्याची जास्त गरज आहे. तेव्हा शनिवारी होणारा पाणीपुरवठा नगरपालिकेने बंद करू नये अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here