Beed : अत्यावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग, कॉलनी निहाय दुकानांची यादी जाहीर 

वाचा प्रभाग क्रमांक व मोबाईल क्रमांक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बीड – शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक किराणा सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग, कॉलनी निहाय दुकानांची यादी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.  

बीड शहरातील किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याचे अनुषंगाने किराणा दुकानांची त्यांच्यासाठी नेमलेल्या प्रभाग, कॉलनी, गल्ली निहाय यादी ज्यात संबंधित नेमलेल्या दुकानांचे नाव, पत्ता , मोबाईल क्रमांक व दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नांव व मोबाईल क्रमांक निहाय यादी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी केवळ अत्यंत आवश्यक किराणा सामान जसे की, तेल, गहू, तांदूळ, साखर अशा वस्तूंचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदार
यांचेकडे नोंदवावी.
नागरिकांनी संबंधित दुकानदार यांचेकडे अनावश्यक वस्तू  परफयुम अशा बाबी मागणी करु नये. संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. ते दु. १२.०० वा पर्यंत सामानाची घरपोच डिलेव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल अशा सूचना संबंधित कर्मचारी व दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत.
 नागरिकांनी दुकानदारांशी बिलाविषयी चर्चा करावी आणि मगच मागणी नोंदवावी. दुकानदाराकडे Paytm, Google pay किंवा ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुनच व्यवहार करावा, अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्याचेकडे समक्ष रक्कम स्वत: एका पाकिटात भरावी व दयावी. दुकानदारांनीही सदरील रक्कम काळजीपूर्वक हाताळावी.
सर्वांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधावा, सॅनीटायझर, साबणाचा वारवार वापर करावा. सामाजिक अंतर राखावे आणि कोव्हीड विषयक सर्व व खबरदारी घ्यावी. दुकानदारांनी सामानाचे दर जास्त आकारल्यास त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
नियुक्त कर्मचारी हे बीड शहराबाहेरील निवासी आहेत त्याची नोंद घ्यावी. तसेच ज्या नागरीकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होऊ शकणार नाही त्यांनी खालील कर्मचारी यांचेशी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा.
सोबत अनुक्रमे कर्मचाऱ्याचे नांव, प्रभाग क्रमांक व मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहे—-
रुपकांत जोगदंड , प्रभाग क्रमांक १,९,१०,११ संपर्क/ मोबाईल क्रमांक ८८३०९४८५९४
महादेव गायकवाड , प्रभाग क्रमांक २,७,८,६  संपर्क/ मोबाईल क्रमांक ८४४६७६७६१५
भागवत जाधव, प्रभागक्रमांक  १२,१३,२२,२३,२४ संपर्क/ मोबाईल क्रमांक ९१६७४८९३८८
भारत चांदणे , प्रभाग क्रमांक ३,४,५,१८,१९
संपर्क/ मोबाईल क्रमांक ९१३०९१८६२८
प्रशांत ओव्हाळ, प्रभाग क्रमांक १४,१५,१६
संपर्क/ मोबाईल क्रमांक ७०२०१४३६५४
राजू वंजारे, प्रभाग क्रमांक १७,२०,२१,२५
संपर्क/ मोबाईल क्रमांक९३७०७६७४७६
याचबरोबर नागरीकांनी Nondly ॲपचा वापर करताना  त्यांचे प्रभागातील दुकानदारांशी चर्चा करूनच  करावा व सदरील ॲपवर नागरीकांना साहित्याचे दर सुध्दा दुकाननिहाय पाहता येतील.
शहरातील व ग्रामीण भागातील इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण बीड शहरामध्ये ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here