Shrigonda : अखेर आर्वी बेटावरील वाहतुकीसाठी रस्ता बंद

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अजनूज – श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटावरील रस्ता गावकऱ्यांनी बंद केला.अजनुज जवळील भीमा नदीवरील पूल बंद केल्यामुळे बरीच वाहतूक आर्वी बेटावरू होत होती.
दिवसाकाठी दोनशेहून अधिक दुचाकी वाहने जा ये करत होती. शेजारच्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आपल्या गावाला धोका सभावतो त्यासाठी दोनदा रस्ता बंद केला तरी दुचाकीवाले एका बाजूने जात. येथूनच सिद्धटेक, भिगवण, इंदापूर आदी ठिकाणांहून लोक जात होते.
आज गावचे सरपंच, सदस्य, शेख ग्रामसेवक, काही मान्यवरांनी आर्वी बंधारावरील रस्ता बंद केला. गावातील लोकांची धाकधूक वाढत चालली होती. श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे हा खुसकीचा मार्ग बंद करणे गरजेचे होते. शेवटी हा बेटावरील रस्ता बंद करण्यात आला.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here