Shirdi : निमगावातील ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह; परिसरातील रुग्णसंख्या 5 वर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शिर्डीच्या शिवेवर असणाऱ्या निमगावात कोरोना बाधित महिला आढळल्यानंतर प्रशासनाने तब्बल २९ जणाचे स्राव अहवाल मागविण्यात आले. ‘त्या’ बाधित महिलेच्या संपर्कात आलेले आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता ही संख्या पाच वर येऊन ठेपली आहे, अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

बुधवारी रात्री त्या भाजी विक्रेती महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव आला होता. तिच्या संपर्कातील २९ जणांचे स्राव अहवाल प्राप्त करण्यासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील अति तातडी म्हणून त्या महिलेच्या कौटुंबिक सदस्यांची हायरिस्क स्राव अहवाल प्राधान्याने तपासण्यात आले होते.

त्यामध्ये त्या महिलेचा पती, एक मुलगा, सून आणि नात अशा चौघांचा समावेश आहे. यांचे अहवाल हे प्रशासनास पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिर्डीसह परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here