Shrigonda : पाईपलाईन क्रॉसिंगसाठी रस्ता फोडला, पहा लाखो रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्याची दुर्दशा

रस्ता फोडणा-या शेतक-यावर कारवाईची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री    

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरातून टाकळी कडेवळीत कडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाईपलाईन क्रॉसिंगच्या नावाखाली रस्ता फोडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. तरी रस्ता फोडणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.

श्रीगोंदा शहरातून भिंगार मार्गे टाकळी कडेवळीत येण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून एक उत्तम दर्जाचा रस्ता बनवण्यात आला परंतु शेतकऱ्यांनी पाईपलाईन क्रॉसिंगच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून बनवलेला रस्ता खोदला आहे. त्यामुळे त्याठिकाणी गतिमान वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळआपट होताना दिसत आहे.
तरी याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकरी आम्हाला ठेकेदारांनी फसविले आहे. त्यामुळे आम्ही रस्ते खोदले आहेत ठेकेदाराने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही रस्ते खोदले आहेत, असे सांगितले जात आहेत. मात्र, रस्ते खोदलेल्या ठिकाणी अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदार व रस्ते खोदणाऱ्या शेतक-यांवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातून होताना दिसत आहे.

रस्त्याची दुर्दशा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here