Shevgaon : तालुक्यात चाकणमार्गे कोरोनाचा शिरकाव; ढोरजळगाव येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
ढोरजळगांव – शेवगाव तालुक्यातील मौजे ढोरजळगाव येथील एक तरूण व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह निघाला आहे. पुणे चाकण येथून आलेला युवक बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर युवकाने शेवगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती आहे. बाधिताच्या संपर्कातील नागरिक भयभीत असून दोन महिने निरंक राहिलेल्या शेवगाव तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येने १०० री ओलांडली मात्र, शेवगाव तालुका कोरोना व्हायरसपासून दूर होता. मात्र, आज सकाळी बाधीत रूग्ण सापडल्याचे वृत्त आले नि इतक्या दिवस कोरोनाचा शिरकाव न झालेला तालुका म्हणून ओळखला जात असलेला शेवगाव तालुका अखेर कोरोना बाधिताच्या यादीत जमा झाला.
प्रशासनाने तहसील स्तरावरून त्वरीत उपाययोजना म्हणून आज दुपारी १ वाजल्यापासून ७ जून रात्री १२ वाजेपर्यंत ढोरजळगाव गावठाण पूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. या दहा दिवसात कोणालाही गावात येण्यास व बाहेर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. तर ढोरजळगाव आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक होऊन पुढील काळात करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा झाल्याचे समजते. गावातील सर्व व्यवहार दहा दिवस बंद राहणार असून शेजारच्या गावातील नागरीकांनी ही या घटनेचा चांगला च धसका घेतला असून दु १२ वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या वृत्ताने अवघ्या काही मिनिटात ढोरजळगाव गाव निर्मनुष्य झाले आहे. तसेच ढोरजळगाव गावच्या आसपासच्या सर्व सीमा पुढील सात तारखेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत, नुतन तहसीलदार अर्चना भाकड कोरोना काळात झालेली नियुक्ती कोरोना व्हायरसच्या रूग्णानेच त्यांचे स्वागत केले आहे.

आरोग्य प्रशासनाने कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ लोकांना पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे, तसेच ढोरजळगाव गावाला प्रांत अधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार अर्चना भाकड, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, शेवगाव पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, शेवगाव तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिरानी इत्यादि अधिका-यांनी भेटी देऊन वैद्यकीय आधिकारी डॉ. सुशिल बडे व डॉ. कुलकर्णी यांच्यासह कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या, आहेत.

शेवगांव तालुका कोरानो मुक्त ठेवण्यासाठी सुरूवातीपासून डी वाय एस पी मंदार जवळे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सुरूवातीपासून सीमा बंद ठेवल्या होत्या. मात्र, मध्यतंरी लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथीलता मिळाल्याने मुंबई-पुणे या ठिकाणावरून बरचसे नागरिक गावामध्ये येत असल्याने धोका वाढत आहे. दोन महिने पोलीस प्रशासन आरोग्य विभागाला कोरोनाला शेवगांव तालुक्यातून रोखण्यात यश आले होते. मात्र, चाकण येथून आलेला तरूण कोरोना पाझिटीव्ह निघाल्याने तालुक्यात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here