Jalana : चंदनझिरा येथे तलवारींसह ५७ हजाराची गावठी दारू जप्त

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – चंदनझिरा अवैध गावठी दारु विक्री करत असल्याची माहिती दारुबंदी विषेश पथकाला लागल्याने आज सकाळी या अड्डयावर धाड टाकण्यात आली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारु व दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की चंदनझिरा येथील लालूप्रसाद सुदाम जाधव आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर दारूबंदी विशेष पथकाने आज सकाळी धाड टाकली. यावेळी गावठी दारूच्या अड्ड्याची व घराची झाडाझडती घेत असताना त्याठिकाणी दोन तलवारी आढळून आल्या. या धारदार तलवारीसह सुमारे ५७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, यशवंत मुंढे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, सर्जेराव हिवाळे, अलका केंद्रे, रत्नमाला एडके, चालक दीपक अंभोरे यांची कारवाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here