गावक-यांची माणुसकी : …इथे झाले भूमिपुत्रांचे वाजत-गाजत स्वागत; स्थलांतरित मजुरांना शेतात केले क्वारंटाईन

कोरोनासोबत लढायचे कोरोनाबाधित रुग्णांसमवेत नाही – बीडमधील पिंपरनेर गावक-यांनी दिला मोठा संदेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
शिरूरकासार : मुंबईवरून आलेल्या आपल्या गावातील भूमिपुत्रांचा तिरस्कार न करता ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करून त्यांच्या शेतामध्ये त्यांना काँरटाईन केले. 

करोनाच्या वाढत्या प्रभवामुळे ग्रामीण भागातील नागरिक मुंबई, पुणे,औरंगाबाद व ईतर शहरातील भूमिपुत्रांकडे नाक मुरडत आली ‘कोरोना घेऊन ही बला’ म्हणत तिरस्कार करताना दिसत आहे. गेली दोन महिने दहा बाय दहाच्या खोलीत बंदिस्त राहिलेल्या भूमिपुत्रांना गावाकडे यावे वाटते आले तर अपमानित केल्याचे अनेक उदाहरणे घडली असताना पिंपनेरकरांनी मात्र मुंबईच्या परळ भागातून आलेल्या दहा भूमिपुत्रांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत जंगी स्वागत केले व  नंतर शेतामध्ये त्यांना क्वारंटाईन केले.
यावेळी बोलताना सरपंच बबनराव जायभावे म्हणाले की उदरनिर्वाहासाठी गेलेले ते आपले बंधुच आहेत. हे समजावून घेऊन आपल्याला कोरोना सोबत लढायचे आहे रूग्णांसोबत नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे, असे सांगून आपल्या गावात आलेल्या आपल्या भुमिपुत्रांचा संन्मान करा, असेही त्यांनी सांगितले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here