Kada : होम क्वारंटाईन नागरिकांनी बाहेर फिरु नये – तहसिलदार थेऊरकर

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सध्या आष्टी तालुक्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह विविध भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात, गावात आलेले आहेत. जे नागरिक जिल्हा बाहेरून आलेत, त्यांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हातावर शिक्का देखील मारण्यात आला असून यापैकी जर कुणी बाहेर फिरले, किंवा अशांना रिक्षा, खाजगी प्रवासी वाहतूक करणा-यांनी वाहनातून फिरवू नये, जर असे कुणी प्रवास करताना आढळून आले. तर त्या नागरिकांसह वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वस्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांनी देखील सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्या बाहेरहून नागरिक आपल्या तालुक्यात आले आहेत. जे नियमाप्रमाणे परवानगी घेऊन आलेत. त्या सर्वांना होम क्वारंटाईनचा हातावर शिक्का मारला आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांनी आपले घर सोडू नये, तसेच खाजगी प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनधारकांनी तसेच रिक्षा संघटनेही होम क्वारंटाईन प्रवाशांना आपल्या वाहनात बसवू नये, जर असा काही प्रकार आढळून आल्यास संबंधित वाहनाचालकासह त्या शिक्का मारलेल्या नागरिकावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार थेऊरकर यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here