Shrigonda : पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या सुलक्षणा पाडळे बिनविरोध

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे दिनकर पंदरकर यांच्या पैनलच्या सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी माजी आमदार राहुल जगताप यांच्या पैनलच्या अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव जागेवर असलेल्या सुमन मोरे यांचे पद पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केल्या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने रद्द करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता. रिक्त असलेल्या जागेसाठी २९ मे रोजी सरपंच निवडी बाबत सभा घेण्यात आली होती.

सरपंचपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्याने माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या पॅनलतर्फे सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. दुपारी २ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच निवड करिता विशेष सभा बोलावली होती मात्र गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आल्याने.

सभा तहकूब झाल्याची नोटीस नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करून दि.३० रोजी पुन्हा दुपारी २ वाजता सभा घेण्यात आली. या सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता नसल्याने पंदरकर गटाचे ६ सदस्य हजर तर जगताप गटाचे ११ जण गैरहजर असल्याने सरपंचपदी सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी म्हणून बेलवंडी मंडलचे सर्कल कांबळे पी.जे यांनी कामकाज पाहिले. तर तलाठी स्वप्नील होळकर आणि ग्रामसेवक बी. वाय मेहत्रे यांनी त्यांना निवडणूक कामी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here