Shrigonda : कुकडीचे येडगावमधून ६ जूनला आवर्तन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी येडगाव धरणातून 6 जूनला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी दिली.

काही दिवसापूर्वी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनाबाबत सर्व अधिकार जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांना देण्यात आले होते. शनिवारी सकाळी हेमंतराव धुमाळ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय घेतला. आता कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. दि 1 जूनपासून पिंपळगाव जोगेच्या डेड स्टाॅकमधून येडगावमध्ये पाणी फिडीग करण्यात येणार आणि ६ जून पाणी येडगावमधून पाणी सोडण्यात येणार टेल टू हेड पद्धतीने आवर्तन करण्यात येणार आहे.

डिंबेचे पाणी नाही!
डिंबे लाभक्षेत्रात आवर्तन चालू आहे. त्यामुळे डिंबेचे पाणी येडगावमध्ये येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टाॅकवर नगर सोलापूरला पाणी देण्यात येणार आहे, असेही हेमंतराव धुमाळ म्हणाले.
पाचपुते शिंदेचा दणका
शुक्रवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते व प्रा. शिंदे यांनी कुकडीच्या आवर्तनावर 1 जूनपासून करण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या आणि कुकडीचे आवर्तन सोडण्यावर शासनाने निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here