विरोधीपक्षनेते देवेंद्र फङणवीस यानां मनशांतीची गरज… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देणार “ही” तीन पूस्तके भेट..!

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनशांतीसाठी तीन पुस्तकं भेट देणार” असं हसन मुश्रीफ म्हणाले. “देशावर कोरोना संकट आहे आणि फडणवीस राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांना ‘मौनम सर्वाथ साधनम्’, ‘मौन व्रतातून मनाची शांती’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ ही पुस्तकं भेट देणार आहे” असं मुश्रीफ यांनी नमूद केलं. ते कोल्हापुरात बोलत होते.
“सत्ता कुणाचीही असू द्या संकटकाळात सरकारबरोबर असणं गरजेचं असतं. मात्र फडणवीस हे राजकारण करत आहेत. फडणवीस माझे मित्र आहेत. ते आधी हुशार होते आताच काय असं झालंय कळत नाही. त्यांच्या बोलण्यात तारतम्य नाही. पाच वर्षात नाही हा शब्द ऐकायची त्यांची सवय मोडली म्हणूनच त्रास करुन घेत असावेत, अशी टोलेबाजीही मुश्रीफ यांनी केली.

हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

“कोरोना काळात राज्यात राजकारण सुरु आहे. हे संकट इतकं अनपेक्षित आहे की त्याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. दोन-तीन महिन्यापूर्वी मला कुणी सांगितलं असतं की कोरोना दोनशे राष्ट्रात येणार आहे, लॉकडाऊन होणार आहे, रस्ते ओस पडणार आहेत, इंग्लंडच्या राजाला, राणीला कोरोना होणार आहे, त्यांच्या (इंग्लंडच्या) पंतप्रधानाला होणार आहे, तर विश्वास बसला नसता. इतकं गंभीर संकट आहे, यामध्ये राजकारण करु नये. एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत. अमेरिका, फ्रान्स, चीन यासारखी पुढारलेली राष्ट्रं घायकुतीला आली आहेत.
देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. आम्ही विधानसभेत एकत्र आहोत. पहिल्या 15 वर्षांमध्ये मी मंत्री होतो, ते विरोधी पक्षात होते. ते विरोधी पक्षनेते नव्हते, पण हुशार माणूस होता. चौथ्या टर्मला ते एकदम मुख्यमंत्रीच झाले आणि आम्ही विरोधी पक्षात गेलो. या पाचव्या टर्ममध्ये आम्ही मंत्री झालो आणि ते विरोधी पक्षनेते झाले. माजी मुख्यमंत्री झाल्यामुळे ते सीनियर झाले आहेत.

आता सवाल काय आहे की, गेल्या पाच वर्षात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांना काय सहनच होईना झालंय आता. ‘हम करे सो कायदा’ असं त्यांचं होतं. त्यांनी गेल्या पाच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीची अनेक माणसं फोडून आपल्या पक्षात घेतली, स्वत:च्या पक्षात अनेकांना घरचा रस्ता दाखवला. पण अशा काळात ते असं बोलत आहेत, इतका शहाणा माणूस, माझे मित्र आहेत ते, पण कशापद्धतीने काय करावं, काय नाही, हे कळेनाच झालंय त्यांना.
त्यांचा स्वभाव असा बनलाय की, गेल्या पाच वर्षात त्यांना नाही म्हणणारं कोणी भेटलं नाही, त्यामुळे त्यांना आता सहन होईना झालंय. त्यांनी या परिस्थितीचं आकलन करुन आम्हाला सल्ला दिला पाहिजे. म्हणून मी माझ्या मित्राला तीन पुस्तक पाठवणार आहे. मौनम सर्वाथ साधनम्, मौन व्रतातून मनाची शांती आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय ही पुस्तकं पाठवणार आहे.

4 COMMENTS

  1. Just desire to say your article is as astonishing. The clearness in your submit is just excellent and that i could assume you are an expert on this subject. Fine along with your permission allow me to grasp your RSS feed to keep up to date with coming near near post. Thanks 1,000,000 and please keep up the rewarding work.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here