Shirdi : साईनगरीत एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; हायअलर्ट जारी

0
अत्यावश्यक सेवा बंद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

साईंची नगरी शिर्डीमध्ये निमगाव पाठोपाठ आता एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून ही महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र या महिलेच्या संपर्कातील हायरिस्क स्राव हे निगेटिव्ह असल्याने थोडा आधार मिळाला आहे. तरीही प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

शिर्डी शिवेलगत असणाऱ्या निमगावत बुधवारी जी महिला सापडली होती. तिच्या पूर्व इतिहासात ही महिला संपर्कात आली होती. त्या २९ अहवालात या महिलेचा समावेश होता. या महिलेचा अहवाल प्रशासनास शनिवारी ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. ही महिला शिर्डीतील जोशी शाळेसमोरील परिसरात ही महिला राहत असून तिचे वय ६० आहे. या महिलेस मधुमेह, थायराईड अशा व्याधी आहेत.

निमगावात ज्या दिवशी पहिली महिला आढळली व इतर चार जण पॉझिटिव्ह आल्याचे कळाले. त्याच दिवशी शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी शिर्डीतील नवीन पिंपळवाडी रस्त्यावरील दुकाने बंद केली. त्याच प्रमाणे भीमनगर, कालिकानगर, जोशी शाळा परिसर हा सील करण्यात आला होता. त्यानंतर हा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर त्या महिलेस नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिच्या कुटुंबातील सदस्य दोन मुलं, एक मुलगी यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असल्यामुळे प्रशासनास व शिर्डीस जमेची बाजू भविष्याच्यादृष्टीने ठरू शकते.
मात्र, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, या भागासह इतर भागावर ही नियंत्रण ठेवून आहेत. तर या भागात फवारणी वाढवली आहे. या भागातील आरोग्य तपासण्याही वाढवल्या जाणार आहेत. तर हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरी या भागातील आणखी आरोग्य तपासण्या वाढवणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

मात्र, शिर्डीतील अत्यावश्यक सेवा चालू राहील का नाही याबाबत प्रशासन नियोजन करत आहे. अथवा शिर्डीतील कोणता भाग सुरू राहील अथवा बंद राहील याचे नियोजन प्रशासन करत. त्यामुळे एकंदरीतच शिर्डीतील टाळेबंदी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here