Karjat : राशीन येथे आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळले, दोन्ही व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कातील

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ३०

कर्जत : राशीन येथील काल ५३ वर्षीय कोरोना बाधित यांच्या संपर्कातील शनिवारी दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कर्जत येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या एकूण सहा झाली आहे. राशीन येथील परिसर शुक्रवारी रात्रीच प्रतिबंधित करण्यात आला असून राशीनकराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय घेत राशीनचा भाग धडक कृती दलाकडे सोपविला आहे.

पुणे येथून प्रवास करून आलेल्या मूळचे राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आला होता. त्या अनुषंगाने कालच राशीन येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रशासनाकडून घेण्यात आला होता. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकूण १४ व्यक्ती नगरला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली होती. यापैकी शनिवारी दुपारी ८० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन आणखीच सतर्क झाले आहे. आजच्या दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राशीन येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची एकूण संख्या पाच झाली असून सिद्धटेक येथील एक कोरोनाग्रस्त महिला मिळून एकूण सहा कोरोना रुग्ण कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत.

यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे. बाधित व्यक्ती राहत असलेला सर्व परिसर प्रशासनाने प्रतिबंधित केला असून त्या परिसरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here