एकूण कोरोणाग्रस्तांची संख्या 590
अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूर: जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल दिवसभरात तब्बल ६८ रूग्णांची वाढ झाल्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी २८ रूग्णांचे अवहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या २८ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 590 वर पोहोचली आहे.
आता सापडलेल्या २८ रूग्णांपैकी 15 पुरूष, 13 महिला असून त्यातील 6 गडहिंग्लज, 10 कागल, पाच भुदरगड तर करवीर, शाहूवाडीतील प्रत्येकी एक, आजरा दोन, उर्वरित शहरातील आहेत.
आजर्यात काेराेना बाधितांची संख्या वाढती; अर्ध शतकाकडे वाटचाल दरम्यान, आजरा तालुक्यात काेराेना बाधितांची संख्या वादत आहे. उशिरा प्राप्त झालेल्या अहवाला नुसार काेराेना बाधितांचा आकडा ४१ वर पाेहचला आहे. तालुक्याची वाटचाल अर्ध शतकाकडे सु्रू आहे. काल श्रृंगारवाडी येथे तिन रुग्ण आढळले. हे एकाच कुटुंबातील आहेत. सात दिवसांआधी या कुटुंबातील युवतीचा अहवाल पाॅझिटिब्ह आला हाेता. काल तिची आजी, बहिण, भाऊ यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या गावात रुग्ण संख्या ६ वर पाेहचली आहे. चिमणे या गावात एका तरूणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ताे मुंबईहून परतला हाेता. येथे बाधितांची संख्या ४ झाली आहे. बहिरेवाडीत दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. हे दाेघे तरुण मुंबईहून पंधरा दिवसांआधी गावी आले हाेते. सर्वाना आजर्यातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
काल सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू
सीपीआरच्या कोरोना कक्षात जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त पोलिसाचा काल सकाळी मृत्यू झाला. ते मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले होते. मृत्युपश्चात त्यांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ५५ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 590 झाली आहे. त्यातील दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.