PM Modi, Man ki Baat : सेवा देशाची मोठी शक्ती

3

राष्ट्र सह्याद्री 

सेवा परमो धर्मः हे आमच्या संस्कृतीचे ब्रीद वाक्य या संकाटाच्या काळात सगळे जोपासत आहेत. सेवा हीच आमच्या देशाची मोठी शक्ती आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

सध्या कोरोनाचा 5 वा लॉकडाऊन अनलॉक 1 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तामिळनाडूतील एका माणसाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी मेहनतीने साचवलेले पैसे कोरोना काळात गरिबांसाठी खर्च केला. तसेच अन्य अनेक ठिकाणच्या नागरिक आपआपल्या परीने केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी मन की बातमध्ये केला.

यावेळी त्यांनी आपल्या देशात कोरोनाच्या संकट काळात श्रमिक वर्गाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला त्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. सोबतच रेल्वे प्रशासन, डॉक्टर्स, व कोरोनाशी लढणा-या सर्वच प्रकारच्या सेवा देणा-यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

या व्यतिरिक्त पर्यावरण दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस यावरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे https://www.narendramodi.in/watch-live  या संकेतस्थळावरही प्रसारित केले जाते. तसेच वेबसाईट वर मन की बात मधील वेगवेगळ्या मुद्यांवर ट्विट केलेले व्हिडिओही पाहायला भेटतात.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here