Sagamner : आणखी 5 नवीन कोरोना बाधित; पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा गेला 44 वर

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरकरांची पाठ आज ही कोरोना सोडताना दिसत नाही. आज ही संगमनेरात नावाने कोरोनाच्या पाच पॉझिटिव रुग्णांची वाढ झाली असून संगमनेर आता दर दिवशी कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये काळजीचे व घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.

आज सायंकाळी शहरातील कोल्हेवाडी रोड येथे बावीस वर्षीय आणि चोवीस वर्षीय युवक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची वार्ता शहरात येऊन धडकली. हे दोघेही आधी सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. हा संपूर्ण परिसर या पूर्वीच कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता या परिसरातीलच या दोन व्यक्ती आहेत. तर तिसरी खळी पिंपरी येथील 27 वर्षीय व्यक्ती ही नुकतीच मुंबईहून येथे आली होती त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती येथे आल्यानंतर त्याला क्वारंटाईन केलेले होते. तर चौथा व्यक्ती ही संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष आहे. तर पाचवी व्यक्ती मुंबई विक्रोळी येथून डिग्रस मालुंजा येथून आलेली ५२ वर्षीय महिला आहे.

या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन युद्धपातळीवर घेत आहे. तसेच त्याच्या जवळपासच परिसरात बॅरिकेट टाकणे आणि हा परिसर निर्जंतुकीकरणाचे काम सुद्धा आता सुरू झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here