Karjat : शहराला पावसाने दिली हजेरी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कर्जत शहर आणि परिसरात रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी दिली. संध्याकाळी उशिरापर्यंत तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी नुकसान झाली नसल्याची माहिती उपलब्ध नव्हती.

रविवार दि ३१ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास चांगल्या पावसाने हजेरी दिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अनेक रस्त्यावर चांगले पावसाचे पाणी वाहिल्याने मान्सूनची चाहूल नागरिकांना दिलासा देणारे ठरले. या पावसाने संध्याकाळी उशिरापर्यंत महसुली दप्तरी कुठल्याही प्रकारचे नुकसान झाली नसल्याची नोंद उपलब्ध नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here