प्रवासी वाहतूक : रेल्वेच्या विशेष 100 गाड्या आजपासून सुरू; मुंबईतून वाराणसीला जाणारी पहिली ट्रेन रवाना

मुंबई-पुण्यातून प्रत्येकी 5 ट्रेन रवाना 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी आजपासून रेल्वेने 100 विशेष रेल्वे सरु केल्या आहेत. महाराष्ट्रातून ही सेवा अंशतः सुरू करण्यात आली आहे. मुंबईतून वाराणसीला जाणारी पहिली ट्रेन आज मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुटली.

या ट्रेनमध्ये जेवणाची पाकिटे, चहा-कॉफी आणि पिण्याच्या पाण्याची सोय रेल्वे केटरर्सकडून करण्यात येणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये वातानुकुलित श्रेणींसह जीएस डब्ब्यांतही बसण्यासाठी राखीव श्रेणी असेल. काऊंटर वरून तिकिट बुकिंग करता येणार नाही. आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातूनच तिकीट बुक करता येणार आहे.

महाराष्ट्रांतर्गत प्रवास मात्र, या गाड्यांमधून करता येणार नाही. मुंबईहून जाणा-या गाड्या पुणे मार्गे जाणार असल्या तरीही मुंबई-पुणे प्रवास करता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here