Breaking News : पेट्रोल-डिझेलनंतर विनाअनुदानित गॅसही महागला; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना फटका

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महागला आहे. विनाअनुदानित 14.5 किलोचा गॅस सिलिंडर 11 रुपये 50 पैशांनी महागला असून 19 किलोग्रामचा गॅस 110 रुपयांनी वाढणार आहे.

अहमदनगरला 593 वरुन 604.50 रुपयांवर गेला. तर 19 किलो ग्रॅमचा सिलेंडर 1055 वरुन 1165 रुपयांवर गेला आहे‌. प्रत्येक शहरातील स्थानिक करपद्धती आणि वाहतूक यानुसार सिलेंडरची किंमत काही फरकाने कमी-अधिक असू शकते.

आधीच लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून कामे बंद असल्यामुळे सर्वसामान्य माणूस घरखर्च चालवताना मेटाकुटीस आला आहे. त्यात आता गॅस महागल्याने सर्वसामान्यांवरचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here