Shrigonda : कुकडीच्या पाण्यासाठी बबनराव पाचपुते यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी दि .१ जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

कुकडीचे आवर्तन ६ जूनपासून सोडणार असल्याचे कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी जाहीर केले आहे. मात्र हे आवर्तन दि १ जूनपासून सुरु करणे आवश्यक असल्याने आमदार पाचपुते यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, प्रा.तुकाराम दरेकर, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड उपोषणास बसले आहेत. कुकडीमधून शेतीसाठी तीन आवर्तने सोडता येतील अशी परिस्थिती होती. परंतु पुणे जिल्ह्याने तीन टीएमसी जादा पाणी वापरले. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या.

६ जून रोजी सुटणारे तिसरे आवर्तन हे पिण्यासाठी सोडण्यात येणार असून तेही उशिरा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असल्याने आमदार पाचपुते हे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी कोरानाचे व संचारबंदीचे सर्व शासकीय आदेश पाळत बसले आहेत.
आमदार बबनराव पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपचे अनेक कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊन पाचपुते यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here