Home Nagar Ahmednagar Nagar: शहराच्या इतिहासात झालं नसेल असं आंदोलन आपल्या कार्यकाळात झाल्याची नामुष्की आपल्यावर...

Nagar: शहराच्या इतिहासात झालं नसेल असं आंदोलन आपल्या कार्यकाळात झाल्याची नामुष्की आपल्यावर ओढावेल…

4

पप्पु पाटील यांचा मनपा आयुक्तांना इशारा

नगर : शहरातील रामवाडी परिसरातील रस्ता सध्या खराब झाला असून कोणत्याही परस्थितीत हा रस्ता व्हावा अशी मागणी येथील नागरीकांची असल्याने त्यांनी वारंवार मनपाचे उंबरे झिजवले आहे मात्र, तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने आता आमदार संग्राम जगातप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामवाडी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पप्पु पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकन करणार असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

रामवाडी परिसरात गरिब कष्टकरी नागरिक राहतात, या नागरिकांचा वापर फक्त मतदार म्हणून किती दिवस करणार? पॅचिंग च्या गोंडस नावाखाली कोण मलिदा खातोय हे सर्व नगरकर जाणतात. आमच्या संयमाचा बांध ढळू देऊ नका, अन्यथा या शहराच्या इतिहासात झालं नसेल असे आंदोलन आपल्या कार्यकाळात झाल्याची नामुष्की आपल्यावर ओढावेल, असा इशारा आयुक्त आणि महापौर यांना देण्यात आला.
शहरातील वर्दळीचा रस्ता असलेला रामवाडी परिसरातील रस्ता खराब झाला असून या ठिकाणी विद्यार्थ्याची मोठी वर्दळ असते, तसेच या परिसरात दुचाकी वाहनांची मोठी बाजारपेठ असल्याने वारंवार येथे येणार्‍यांची संख्या मोठी आहे मात्र, मनपाला जाग येत नसल्याने आता आंदोलन करण्याशीवाय पर्यय नसल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.

शहरातील रस्ते दुरुस्त करावेत असे आदेश राज्य शासानाने दिले आहे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. एकंदरीत नागरीकांच्या कोणत्याही प्रश्‍नावर प्रशासन आंदोलनाशीवार मार्ग काढत नसल्याचे चित्र असल्याने लवकरच आयुक्तांची भेट घेऊन आम्ही आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. यावेळी सुरेश वैरागार, सतीश साळवे, दीपक वाघमारे, दीपक लोखंडे, गणेश ससाणे, निखिल कोल्हे, विकी तिवारी, सोमनाथ राऊत आदी उपस्थित होते.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here