Shevgaon: शेवगांव तालुक्याच्या पुर्व भागात कोरोनाचा शिरकाव!

राणेगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

उद्धव देशमुख । राष्ट्र सह्याद्री

बोधेगाव:-
शेवगांव तालुक्याच्या पुर्व भागातील बोधेगावपासुन ६ किमी आंतरावर आसणाऱ्या राणेगाव येथे काल सोमवार दि.१ जुन रोजी कोरोनाची ईंट्री झाल्याने बोधेगावसह परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अग्निशामन दलात ड्रायव्हर आसणारा हा व्यक्ती कल्याण येथे रेड झोन मध्ये रहात होता. तेथून तो ३१ मे रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी त्याच्या मुळगावी राणेगाव येथील पालवे वस्तीवर आला. त्याच दिवशी त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्याने वडिलाना सांगितले. त्याच दिवशी पहाटे म्हणजे १ जुन रोजी याच वस्तीवरील मित्राला सोबत घेउन तो थेट जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे गेला व त्याच्या स्रावाची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आसल्या बाबतचा रोपोर्ट १ जुन ला रात्री उशीरा आला.

त्यामुळे आज दि.२ रोजी शेवगांवचे नायब तहसीलदार मयूर बेरड हे गटविकास आधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य आधिकारी डॉ सलमा हिराणी, हातगाव प्रा. आ. केंद्राचे बैद्यकिय आधिकारी संदीप घुले याना घेउन आज सकाळीच रानेगाव मध्ये दाखल झाले. संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील १० व्यक्तीना तपासणीसाठी नगर येथे पाठवले तसेच पालवे वस्ती शिल केली. त्यांच्या कुटुंबातील १६ व्यक्तीना होम क्वारंटाईन केले आहे. तर संपूर्ण पालवे वस्तीवर निर्जंतुकीकरणाची फवारणी केली असून राणेगाव येते आरोग्य सेवक, आंगणवाडी सेविका, आशा स्वय सेविका व सामुदायिक आरोग्य सेवकाकडुन संपूर्ण गावात घरोघरी आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ संदिप घुले यानी दिली आहे.


दोन ते आडिच महिने लॉकडाउनच्या काळात संपूर्ण शेवगांव तालुका कोरोना मुक्त ठेवण्यास तालुका प्रशासन यशस्वी झाले होते. या काळात प्रभारी तहसीलदार मयूर बेरड यांनी संपूर्ण तालुका पिंजुन काढून आरोग्य, पोलिस, तलाठी ग्रामसेवक ते थेट गावच्या कोतवाला पर्यंत समन्वय ठेवून शेवगांव तालुका कोरोना मुक्त ठेवला होता परंतु आर्चना भाकड यानी नव्यानेच तहसीलदार पदाचा कार्यभार स्विकारला आणि दोनच दिवसानी ढोरजळगाव येथे कोरोनाची सलामी मिळाली. त्यानंतर शहरटाकळी आणि आता तालुक्याच्या पुर्व भागातील राणेगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळुन आल्याने तालुका प्रशासन सतर्क झाले आहे.

लॉकडाउन शिथिल झाल्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणाहुन तालुक्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आसुन बाहेरून येणाऱ्या लोका पासुन तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होउ नये यासाठी येणाऱ्या काळात प्रशासना सोबतच नागरिकानी काळजी घ्यावी.

– डॉ.क्षितिज घुले – सभापती पंचायत समिती शेवगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here