आरे बाप रे… …कांद्याच्या चाळीतच बिबटयाने ठोकला रात्रभर मुक्काम….

2

प्रवरा नदीपात्राशेजारील बिबटयाची दहशत कायम

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावची घटना

भरत थोरात । राष्ट्र सह्याद्री

उक्कलगाव : प्रवरा, गोदावरी नदीपात्राशेजारील भागातच बिबटयाच्या वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील जि प शाळेच्या वाकण वस्तीवरिल हाकेच्या अंतरावर असणार्‍या संजय शिंदे यांच्या शेतातील शेडमध्ये कांद्याच्या चाळीतच रात्रभर बिबटयाने मुक्काम ठोकला. काल व परवा रात्री उक्कलगाव परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे बिबटयाने या ठिकाणी निवांतपणे जागा शोधातच बिबटयाने रात्रभर मुक्काम केला आहे.

सकाळापासून परिसरात संततधार पाऊस पडत होता. सकाळीच संजय शिंदे हे शेतातच गेले असता ते कांद्याच्या चाळीकडे गेल्यानंतर त्यांना शेडच्या बाहेरून बाजूस आतील बाजूस बिबटयाचे ताजे ठसे निदर्शनात आले. येथीलच भागात उस पिकांचे मोठे क्षेत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर लपन असून येथे नदीपात्रही शेजारीच आहे. उक्कलगाव धनवाट परिसर, लम्हाणबाबा शिवारात, बिबटयाचा धुमाकूळ सुरुच आहे येथीलच अंगणात बिबटयाचे ताजे ठसे सापडले. त्यामुळे या परीसरात भीतीचे वातावरण पसरले असून देवराम चिंधे, गोरख रजपूत, सोमनाथ कर्डीले यांच्या शेतवस्तीवर बिबटयाने रात्रीत शेळ्या- मेंढ्या कुत्रा कालवडीवर फस्त केल्या आहेत. सायंकाळ सुमारास शिवारातच शेतवस्त्यावर हल्ले चढवित आहे. लम्हाणबाबा शिवारातच शेतातच घसा कापत असतानाच तान्हाजी थोरात यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. शिवार ररत्याने गावात दूध घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यांवर हल्ले झाल्याची अनेक प्रकरणे आहेत.

गेल्या वर्षभरापासून बिबटयाने हल्ले वाढत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वीच उक्कलगाव येथील जगधने यांच्या शेतातच, चांडेवाडीत शिवारात पिंजरा लावुन मादी बिबटे चार बछड्यासह पकडण्यात वनविभागाला यश आले. यापुर्वी कुरणपूर येथीलच दर्शन देठे हा दहा वर्षाच्या चिमुरडा गणपती आरती करून घरी परतत असताना, शेजीरीच दबा धरून बिबटयाने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यु झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गळनिंब शिवारात तीन वर्षीच्या ज्ञानेश्वरी मारकड मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत प्रवरा नदीपात्रात परिसरात बिबट्याची दहशत कायमच असल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.

कायमस्वरूपी बंदोबस्त करा

नदीपात्र परीसरात बिबट्याच्या पावलांची ताजे ठसे निदर्शनात येतात रात्रीत दबा बसलेले बिबटे हल्ला चढवितात हल्ल्यानंतर वनविभाग खडबडून जागे होतात त्यानंतर पंचनामाही केला जातो, परंतू ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा कायमस्वरूपी तोडगा काढून बंदोबस्त करावा मागणी प्रकाश थोरात यांनी केली

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here