विकास वाव्हळ । राष्ट्र सह्याद्री

संगमनेर: तालुक्यात आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालुंजे डिग्रस येथील आणखी दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० वर पोहोचली आहे.
रविवारी संगमनेर तालुक्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील मालुंजे डिग्रस येथील ५२ वर्षीय महिलेच्या संपर्कातील मालुंजे डिग्रस येथील ४५ व २१ वर्षीय दोन महिला बाधित झाल्या आहेत. यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोनाची लागण ही बाहेरून आलेल्या बरोबरच संपर्कातून होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धोका वाढलेला आहे. संगमनेरचा करोना बाधितांचा आकडा हा अर्धशतकावर पोहोचला आहे.संगमनेर तालुक्यातील २३ रुग्ण उपचार घेत असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.