Karjat: कलिंगड व्यापाऱ्याचा खून… दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद..!

1

पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाची कारवाई

डॉ अफरोजखान पठाण । राष्ट्र सह्याद्री

कर्जत : मुंबई येथील कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने जेरबंद केले.


पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख यांचा विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्याया उद्देशाने आरोपी मोहन कुंडलिक भोरे (रा कवडगाव ता. जामखेड) अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, नंदू तुकाराम पारे (सर्व रा पारेवाडी ता.जामखेड) यांनी संगनमत करून २० मे ते २६ मे २०१८ दरम्यान वरील कलिंगड व्यापाऱ्याचा दोरीने गळा आवळून जीवे ठार मारून प्रेताची ओळख पटू नये म्हणून खेड ता कर्जत शिवारातील भीमा नदी पात्रात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकून दिले होते.

सदर घटनेपासून या गुन्ह्यातील आरोपी नंदू तुकाराम पारे हा आजतागायत फरार होता. दि २ जून रोजी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वरील फरार आरोपी हा कारेगाव (ता शिरूर जिल्हा पुणे) येथून अहमदनगरकडे टेम्पोने जाणार आहे . यावेळी पोलीस उपअधीक्षक सातव, सपोनि निलेश कांबळे, पोकॉ हृदय घोडके, संतोष साबळे, आदित्य बेल्हेकर, सागर जंगम यांच्यासह मोबाईल सेलचे पोकॉ प्रशांत राठोड, नितीन शिंदे, महिला पोलीस रिंकी मांढेकर यांच्या पथकाने खाजगी वाहनाने नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी चेकपोष्टवर सापळा लावून सदरचा टेम्पो थांबविला असता आरोपी पारे यास त्याची चाहूल लागल्याने त्याने टेम्पोतून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न करताच वरील पथकाने त्यास शिताफीने जेरबंद केले.

कर्जत उपकारागृहातून पाळलेले आरोपी याच गुन्ह्यातील

दि ९ फेब्रुवारी रोजी कर्जत येथील उपकारागृहातून एकूण पाच आरोपीनी पलायन केले होते. यामध्ये याच गुन्ह्यातील तीन आरोपीचा समावेश होता. यापैकी मोहन कुंडलिक भोरे यास पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले होते. तर अक्षय रामदास राऊत आणि चंद्रकांत महादेव राऊत आजतागायत ही सापडलेले नाहीत. तर नंदू पारे हा गुन्हा घडल्यापासून फरारच होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here