Shrigonda : कोरोना संशयित ज्येष्ठ नागरिकाचा निमोनियामुळे मृत्यू

0

मृत्यूनंतर अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – दादर येथून श्रीगोंदा येथे आलेल्या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा काल (दि २) रात्री निमोनियामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोना संशयित म्हणून स्थानिक प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते.

श्रीगोंदा तालुक्यात बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यातच नमूद व्यक्ती मुंबईवरून संक्रमित भागातून श्रीगोंद्यात आल्याने हेही प्रकरण बाधित निघण्याची शंका श्रीगोंदा शहरातील नागरिकांना वाटत होती. मात्र, सुदैवाने सदरील इसम हा कोरोना निगेटिव्ह आला असून, दुर्दैवाने त्यांचा निमोनिया मुळे मृत्यू झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.

घाबरून न जाता तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहुन आपल्या स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे तालुका आरोग्य विभागाने सर्वांना सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here