Ahmednagar : Breaking news : आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण… नगर शहरातील 3, संगमनेरसह श्रीरामपूरचीही विकेट पडली..!

अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित

श्रीरामपूर: उत्तर नगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते मात्र याला श्रीरामपूर अपवाद होते परंतु आज येथील गोंधवणी परिसरात भांडूप मुंबई येथून आलेले एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपूरची विकेट पडली.
शहरातील एक कुटुंब भांडुप येथे राहते. त्यांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आई, वडील, मुलगा व बाधित मुलीची मुलगी असे चौघे 1 जून रोजी श्रीरामपूर ला आले. त्यांनी गोंधवणी परिसरात एका मित्राच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेले. त्यानंतर त्यांना डी पॉल शाळेत कोरोन्टाईन करण्यात आले. त्यानंतर वृद्धाची प्रकृती खालावल्याने पत्नीसह नगरला पाठवण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता पत्नी, मुलगा व नातीचा अहवाल येणे बाकी आहे.

प्रशासन संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे मात्र कोरोन्टाईन करण्याच्या भीतीने लोक माहिती लपवतात, नागरिकांनी स्वतः सह तालुक्याच्या हितासाठी खरी माहिती सांगवी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले आहे.

आजपर्यंत प्रशासनाने खबरदारी घेत श्रीरामपूर शहरात बाहेरून आलेल्या लोकांना वेळेत विलगिकरण कक्षात पाठविले होते. त्यामुळे याठिकाणी आजपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळून आला नव्हता. बाहेरून आलेल्या लोकांबद्दल नागरिकांनी तात्काळ माहिती प्रशासनास कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here