Nisarg cyclone update: रत्नागिरीला ‘निसर्ग चक्रिवादळाचा तडाखा…

झाडे, घरांचे प्रचंड नूकसान; मदत कार्य सूरू

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे.

सध्या रत्नागिरीत निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. त्यांनी वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. ‘टोइंग’ प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here