Nisarg Cyclone update: निसर्ग वादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकलं!

2

प्रतिनिधी। राष्ट्र सह्याद्री

मुंबई। कोल्हापूरः

फेडेक्स कंपनीचे कार्गो विमान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धावपट्टीवरून घसरले.

हे विमान बेंगळुरूहून आले होते. कुठलीही जीवितहानी नाही.

विमान बाजूला करण्यात आले.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सायंकाळी साडेसात पर्यंत बंद.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात,

मदत व बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश वादळाने दिशा बदलली असली तरी मुंबईचा धोका अद्याप टळलेला नाही वादळाचा चकवा;

मुंबईकडे येता-येता ठाणेमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे सरकले!

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील चौपट्यांना भेट देऊन घेतला सद्यस्थितीचा आढावा

संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मुंबई पोलीस व महापालिकेकडून जोरदार तयारी

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळील सुमारे २५ हजार झोपडीधारकांना महापालिकेनं सुरक्षित स्थळी हलविलं

मुंबईच्या विविध भागांत मागील २४ तासांत तब्बल ३७ वृक्ष कोसळले!

महापालिका व एनडीआरएफनं दिलेल्या सूचनांचं पालन करा…

क्रिकेटपटू सुरेश रैना याचं नागरिकांना आवाहन… पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. घरातच राहा. अफवा पसरवू नका…

अभिनेता संजय दत्त याचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मदतीसाठी उतरावे, निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं आवाहन

निसर्गची मुंबईच्या दिशेनं कूच, पुढच्या काही तासांत धडकणार

रायगड: लोणारे येथील आंबरले गावातील १ डीपी आणि ३ उच्च दाब खांब कोसळले.

वडचा कोंद गावातील 1 डीपी व ३ निम्न दाब खांब कोसळले

निसर्ग वादळाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती
निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचं नागरिकांना सहकार्याचं आवाहन

अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी १२०-१४० किलोमीटर वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक वरून कुठल्याही प्रकारची वाहतूक करण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी

तटरक्षक दलाकडून डहाणू, वरळी, मुरुड आणि रत्नागिरीत एकूण 8 बचाव पथके सज्ज. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफची टीम तैनात

पनवेल, कामोठेमध्ये वीजपुरवठा खंडित

रायगड जिल्ह्यातील १३५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची एएनआयला माहिती दिली .

आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात.

मुंबईतील सहा चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक तैनात… रेस्क्यू बोट, जेट स्की आदी सज्ज

मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय.

नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन महाराष्ट्राच्या किनारी भागातून आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची एनडीआरएफची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान. झाडे पडली. घरांचे छप्पर उडाले! वादळाची दिशा ५० किलोमीटरने दक्षिणेला सरकली – हवामान विभागाची माहिती

तटरक्षक दलाच्या देखरेखीखाली ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज मुंबईत आणले जाणार रत्नागिरीजवळ ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले. या जहाजाला मुंबईच्या किनाऱ्यावर यायचे आहे. समुद्र खवळला असल्याने नौकायान महासंचालक कार्यालयाकडून विशेष जहाज पाठविण्यात आले आहे.

आज मध्यरात्रीपर्यंत ‘निसर्ग’चा वेग आणखी कमी होईल आणि गुरुवारी सकाळपर्यंत वादळ बऱ्यापैकी ओसरेल – हवामान विभाग

गुजरातमधील नवसारी आणि वलसाडला पोहोचेपर्यंत वादळाचा वेग ताशी ६०-८० किमी असेल – हवामान विभाग

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असेल असा अंदाज – हवामान विभाग

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here