राणेगावात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह…

मित्राने मित्राला दिला वाणवळा..!

 • उद्धव देशमुख । राष्ट्र सह्याद्री
 • बोधेगाव
  शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे ३१ मे रोजी कल्याणवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह निघाला मात्र त्याच दिवशी पहाटे सदर रुग्णास त्रास होत आसल्याने त्याचा मित्र नगर येथील जिल्हा रुग्णालयात घेउन गेला होता यावेळी त्या दुचाकी स्वाराचे सुद्धा स्रावाचे नमुने घेण्यात आले होते मात्र त्यात आज त्याचा अहवाल कोरोनाचा पॉझिटिव्ह आल्याने कल्याणच्या मित्राणे गावाकडच्या मित्राला कोरोनाचा वाणवळा दिल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

 • दरम्यान मित्राच्या कुटुंबातील त्याची आई वडिल पत्नी व दोन मुलांना तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले असल्याची माहीती हातगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय आधिकारी डॉ. संदिप घूले यांनी दिली आहे.
 • कल्याण वरून गावी आलेल्या मित्राला दूचाकीवरून दवाखान्यात घेवून जाणाऱ्या मित्राला महागात पडले आसुन त्यालाही कोरोनाची लगान झाली. मित्राने गावाकडे येवून दुसऱ्या मित्राला वानवळा दिला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी राणेगावच्या सिमा दहा जून पर्यंत सिल करण्याचे आदेश दिले आहे.मात्र राणेगावच्या सिमा आद्यापर्यंत बंद केल्या नाहित. आरोग्य विभागाने घरोघर जाऊन तपासणी सुरू केली आहेत. दरम्यान दोन आडिच महिने लॉक डाऊन असतांना शेवगाव तालूका कोरोना मुक्त ठेवण्यात तालूका प्रशासनाला यश आले होते.परंतू लॉक डाऊन शिथील झाल्याने मुंबई पुण्या वरून गावाकडे येणाऱ्यांनी तालूक्यात कोरोना आनला आसल्याने आता सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे.
 • अद्याप राणेगावच्या सीमा नाहित सिल…!
  -शेवगाव तालुक्यतील राणेगावच्या सीमा ह्या प्रशासनाने अद्यापही सील केल्या नसून येथील ग्रामस्थ गावच्या बाहेर येजा करत असून इतरही गावचे ग्रामस्थ या गावात येत आहे. येथील ग्रामस्थ कंटेमेंट झोनचे कुठलेही नियम पाळत नसून येथील सर्व रहदारी ही खुलेआम चालू आहे त्यामुळे या गावातील नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेत नसल्याची माहिती येथील राणेगाव उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी परमेश्वर गलांडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
 • शेवगाव-पाथर्डीचे पोलिस उपविभागीय आधिकाऱ्याचे सतर्क राहण्याचे आवाहन-

  • राणेगाव येथील घटनेची माहिती मिळताच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी तात्काळ राणेगाव येथे येऊन गावातील नागरीकांना तसेच आदी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या तसेच त्यांनी गावचा पूर्ण आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचा सूचना दिल्या तसेच सर्वाना सतर्क राहण्याचे आवाहन मंदार जवळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here