चक्रीवादळात डाळिंब बागांचे मोठे नुकसान…

डाळिंबाचे फळे गळाले; आठवाडीत स्विफ्ट कारवर झाड पडून कारचे मोठे नुकसान

भरत थोरात / राष्ट्र सह्याद्री

उक्कलगाव : श्रीरामपूर तालुक्यात काल झालेल्या निसर्ग चक्री वादळाने थैमान घातले.
सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी तर लिंबाचे झाडे उन्मळून पडली.सुदैवाने यातच जीवितहानी झाली नाही.
काल पहाटेच्या सुमारास झालेल्या चक्री वादळाने डाळिबांचे क्षेत्र असणार्‍या पुरुषोत्तम थोरात यांच्या शेतात डाळिबांचे झाडे उन्मळून पडली. या सुसाट वाराने डाळिबांचे फळे गळून पडली होती. या चक्री वादळाने थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाली कालच्या सुसाट वेगाच्या वाऱ्याने एकलहरे शिवारातील येथे आठवाडीत येथे रामकाठी झाड कोसळून त्याखाली आप्पासाहेब शिंदे यांच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्री वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता.
चक्री वादळातच पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. सुसाट वाराने अनेक पिकेही जमीनदोस्त उध्वस्त झाली होती. रात्री उशिरा पर्यत पावसाचे सरीत पडत होत्या श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशावरून चक्री वादळामुळे काल झालेल्या नुकसानीची पिकांची पाहणी, तलाठी इमानदार,सहाय्यक नंदु बोबंले हे शेतकर्‍यांच्या समवेत पाहणी करीत होते सुदैवाने काही ठिकाणी घराजवळील बाजूसच झाडे उखडून पडल्याने काही जीवितहानी झाली नाही येथील परिसरात वार्‍याचा वेग अधीक जास्त होता समाधानकारक पाऊस झालेला असल्याने कपाशी,सोयाबीन,मका,उस, दिलासा मिळाला आहे तीन दिवसांपासून सुरूच असल्या पावसाने खरीप हंगामाची लगबग सुरू आहे उक्कलगाव / लम्हाणबाबा शिवारात चक्री वादळाच्या सोसाट्याचा वाऱ्याने डाळींब बागेचे मोठे नुकसान झाले असून आठवाडीत स्विफ्ट कारवर झाड कोसळून कारचे मोठे नुकसान झाले

6 COMMENTS

  1. I like what you guys are up also. Such intelligent work and reporting! Keep up the superb works guys I¦ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my site 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here