नंदगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारामारीत जखमी फबरूद्दीन मूजावरचा मूत्यू

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री


कोल्हापूरः

करवीर तालुक्यातील नंदगाव येथे काल (बुधवार) शेतीच्या वादातून दोन गटात मारामारी झाली होती. यामध्ये फबरुद्दीन बाबासो मुजावर (वय ४५, रा. नंदगाव) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांचा आज (गुरुवार) सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या नंदगावामध्ये गेले कित्येक दिवस मुजावर आणि चौगुले कुटुंबात शेत जमिनीचा वाद सुरू होता. काल सकाळी फबरुद्दीन मुजावर, त्यांची आई तब्बसन, भाऊ निशांत, चुलत भाऊ निहाल, चुलती जमीला हे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी तेथे आरोपी संदीप चौगुले, सागर चौगुले, बाळू चौगुले यांनी तुम्ही आमचे शेतात का आला म्हणून विचारणा करत चौगुले कुटुंबियांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी फबरुद्दीन मुजावर यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. तसेच आई तब्बसनर यांच्या डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले करण्यात आले. यावेळी प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी आज सकाळी फबरुद्दीन मुजावर यांच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाची अधिक तपास सपोनि. एस. एन. चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here