नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या वतीने “पोलिस वाचवा “अभियान सूरू करणार…

पक्षाचे यूवक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सूशांतभाई गोरवे यांची माहीती

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

राज्यात नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून लवकरच “पोलिस वाचवा “अभियान हाती घेणार असल्याची माहीती पक्षाच्या यूवक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सूशांतभाई गोरवे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.


गोरवे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेत पोलीस कोठडीत एक माणूस मेला तर कोरोना ची पर्वा न करता अमेरिका पेटला पण भारतात एक सच्चा पोलीस अधिकारी भर रस्त्यावर मारला गेला पण कुणालाही फरक पडला नाही.
मालेगाव प्रकरणात चौकशी करत असलेले पोलीस अधिकारी शहीद झाले. श्रद्धांजलि वाहण्यापलीकडे आम्ही भारतीयांनी काय केलं.
आजही पोलीसांवर प्रत्येक गोष्टीचा अतिरिक्त ताण दिला जातो. पोलीस जिवावर उदार होऊन काम करत असतात.
अनेक लोक त्यांना चहा पोहे देतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल करतात. कधी भ्याड हल्ल्यांचे बळी तर कधी कोरोनाचे बळी ठरतात.
अमेरिकेत घडलेल्या प्रकरणानंतर नॅशनल सोशालिस्ट पार्टी ने पोलीस वाचवा ही मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याची सुरवात पार्टी करकरेंच्या मारेक-यांच्या मागे मुख्य सुत्रधार कोण होते याचा शोध घेऊन करणार आहे. प्रसंगी नॅशनल सोशालिस्ट पार्टी कोर्टात नव्याने याचीका दाखल करेल. पार्टी चे जेष्ठ नेते अभिजीत आपटे हे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई हल्ल्याची फेरचौकशी करावी अशी विनंती करणार आहेत तसेच महाराष्ट्र पोलीसांवर हल्ले करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here