शेतकर्‍यांना मोठी संधी आ. विखे

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

‘एक देश एक कृषि बाजार’मुळे

लोणी : केंद्र सरकारने शेतमालाच्या मुक्त विक्री संदर्भात घेतलेला निर्णय हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असुन, ‘एक देश एक कृषि बाजार’ या धोरणामुळे शेतक-यांना मोठी संधी मिळणार आहे, शेती उत्पादीत मालाची विक्री कुठेही करण्याची मिळालेली मुभा आणि कृषि उत्पादनाला किमान दराची हमी देण्याच्या सरकारच्या धाडसी निर्णयाचे माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे. या संदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत कृषि क्षेत्रातील धोरणांच्या बदलांचे संकेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिले होते. त्यानुसार जिवनावश्यक वस्तु कायद्यात बदल करण्याच्या घेतलेल्या निर्णयांमुळे कडधान्य, धान्य, बटाटा, कांदा, खाद्य तेल आदि जिवनावश्यक वस्तु आता प्रतिबंधात्मक यादीतून वगळण्यात आले आहेत. या उत्पादीत मालाच्या साठवणूकीवरचे बंधनही सरकारने उठविल्यामुळे शेतक-यांना आता मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या एक देश एक कृषि बाजार धोरणामुळे राज्यातील बाजार समित्यांचा आधिकार आबाधित राहणार आहेच, परंतू शेतकरी आपला शेतीमाल बाजार समित्यांच्या बाहेर सहकारी संस्था, खासगी उद्योजक यांना सहजपणे विकू शकेल. या खरेदी विक्रीवर कोणताही कर आकारला जाणार नसल्याने शेतकर्‍यांना शेती माल विकण्याचा आधिकार या धोरणातून मिळाला असल्याचे आ.विखे पाटील यांनी स्पष्ट केले. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यापुर्वी व्यापारी, आडते यांची मोठ्या प्रमाणात मक्तेदारी होती,यातून शेतकर्‍यांची सुटका झाली आहे. राज्यात कृषि व पणन मंत्री असताना आपण शेतक-यांच्या संदर्भात निर्णय घेवून ‘शेतकरी ते ग्राहक’ या योजनेची सुरुवात केली होती. त्याचीच फलनिष्पती आता केंद्र सरकारच्या धोरणातून पुढे आल्याचे समाधान असल्याचे नमुद करुन आ.विखे पाटील यांनी व्यक्त केले. शेतकर्‍यांच्या शेती मालाला हमी देणारी व्यवस्था निर्माण करणारा वटहुकूमही केंद्र सरकारने मंजुर केल्यामुळे शेतीमालाच्या निर्यातीला व प्रक्रीया उद्योगाला नवी दिशा मिळेल. यातूनच कृषि व्यवसायाची एक नवी साखळी मजबूतपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here