चक्रीवादळाने विजेच्या खांबासह, झाडे उन्मळून पडली

2

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
राहुरी : शहर व तालुक्याच्या परिसरात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने काल वा-याच्या वेगाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांबही कोसळल्याने लाखोचे नुकसान झाले सुदैवात जीवीतहानी झालेली नाही तालुक्याच्या प्रशासनाने कोरोनाच्या संकटात जशी खबरदारी घेतली तशीच खबरदारी वादळाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याने तालुक्यात वादळ घोंगावत असतानाही प्रत्यक्षात फिल्डवर कार्यरत राहिल्याने निसर्ग वादळाच्या तडाख्यातून राहुरी तालुका मुक्त राहिला.
निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर मुंबईसह प्रमुख सहा जिल्ह्यात धडकणार असल्याने तसेच राज्याच्या इतर भागातही वादळाची झळ पोहचू नये म्हणून प्रशासन अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होते कोरोनाचा कहर त्यातच निसर्ग चक्रीवादळाची लहर घोंगावून राज्यात नवीन संकटाला तोंड देण्याची वेळ प्रशासनासह जनतेवर येवून पोहचली होती.
राज्यातील वादळाची स्थिती पाहता नगर जिल्ह्यातील प्रशासनही सतर्क होते तसेच राहुरी तालुकाही वादळाच्या तडाख्यात येवू नये म्हणून महसुल, पोलिस, महावितरण, आरोग्य विभासह आपत्ती निवारण विभागही सज्ज होता.
राहुरीत काल सायंकाळी सहाच्या नंतर वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झालेली होती आभाळही दाटून आल्याने ढगांच्या वाहण्याचा वेग काल काहीसा वेगळाच होता,जोरदार वारे त्यातच पावसाची रिमझीम यामुळे जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले होते,जोरदार वारे वाहू लागल्याने ग्रामीणसह शहरी भागात अनेक झाडे रस्त्यावर व विजेच्या खांबावर कोसळून पडली तर काही विजेचे खांब वा-याच्या वेगाने उखडले गेल्याचे चित्र दिसून आले तसेच विजेचे रोहित्रही कोसळून पडल्याच्या घटना समोर आल्या सुदैवाने कोरोना संकटात जनता आधीच घराघरात असाल्याने व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच सतर्क केल्याने लोक घराबाहेर नव्हती आणि विजपुरवठाही खंडीत असल्याने हानी टळली तालुक्याच्या सर्वत्र विज सायंकाळपासून बंदच होती,आज सकाळपासून महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर काम हाती घेवून खंडीत झालेला विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवत पडलेले खांब व रोहीत्र बसवण्याठी काम हाती घेतल्याने काही भागात विजपुरवठा सुरळीत झालेला आहे तर काही ठिकाणी व ग्रामीण भागात लवकरच विजपुरवठा सुरळीत होईल असे महावितरण प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
मुळाधरणावरही वादळाचा जोर अधिक असल्याने येथेही विजपुरवठा खंडीत असल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याने शहरवासीयांना आज निर्जळीचा सामना करावा लागला तसेच धरणक्षेत्रातील मत्स्य प्रकल्पांनाही तडाखा बसल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची माहीती मिळाली आहे.
बुधवारी झालेल्या वादळी- वार्‍याने तालुक्यातील बहतेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने आरडगाव- पाथरे सबस्टेशन अंतर्गत येणा-या आरडगाव, मानोरी, वळण, चंडकापुर, केंदळ, गणपवाडी या भागात विद्युत वाहक तारा तुटल्याने वीज पुरवाठा खंडीत झाला होता.पण सकाळी पासुन महावितरण कर्मचार्‍यांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.वळण गावठानामधे पोल व विद्युत वाहक तारा तुटल्याने दोन दिवसापासून वीज पुरवाठा खंडीत होता श्रीरामपुर विभाग कार्यकारी अभियंता शरद बंड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे शाखा अभियंता धिरज गायकवाड, उपअभियंता प्रदिप ढेकरकर, इंजिनियर राजेंद्र भगत, लाईनमन अरूण चव्हाण वायरमण मिलिंद गोसावी, भुषण गावंडे, गौरव आढाव, गणेश बोबडे, महेश आढाव यांनी युद्ध पातळीवर काम करत दुपारपर्यंत वळण आणि परीसरातील वीज सुरळीत करण्यात आला आहे.
तर राहुरी शहरातीलही विजपुरवठा सुरुळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते,शेतीसह आणखी काही नुकसान झाले काय याची प्रशासनाकडून चाचपणी करण्याचे व त्या अनुषंगाने माहीती घेवून पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु झाल्याचे समजते,
दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार फसियोद्दीन शेख व महसुल प्रशासन रात्रंदीन सज्ज होते,पोलिस प्रशासनाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक यशवंत राक्षे,सचिन बागुल,उपनिरिक्षक गणेश शेळके,सानप साहेब,महावितरणचे धिरज गायकवाड यांचेसह संपूर्ण तालुक्याच्या प्रशासनाचे काळजीपूर्वक नियंत्रण व फिरता पहारा यामुळे घोंगावणारे वादळाचे संकटही तालुक्यात हानी पोहचू शकले नाही.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here