संगमनेरात पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
संगमनेर : संगमनेर मध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या आज दोन ने वाढून, आता पर्यंत एकूण 55 झाली आहे. ही परिस्थिती पाहता संगमनेरकरांची पाठ आज ही कोरोनाने सोडली नाही. त्यामुळे संगमनेरकरांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. तर प्रशासन ही हतबल झाले आहे.
आज शहरालगतच्या कोल्हेवाडी येथील एक दिड वर्ष वयाच्या लहान मुलीस व शहराच्या मध्यवस्थीतील नवघर गल्ली तील एका 32 वर्षच्या युवकास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे हे दोन्ही रुग्ण कोरोना बधितांच्या संपर्कात आले होते. कोल्हेवाडी रोड यापूर्वीच सील केला असून मोमीनपुरा व नवघर गल्ली हे परिसर शेजारी शेजारी असल्याने मोमीनपुरा परिसर या पूर्वीच सील केला आहे आता नवघर गल्ली परिसर आज सील केला जात आहे.
प्रशासनाने जे-जे उपाय सांगितले आहेत त्यांची पूर्णपणे शहरात अंमलबजावणी सुरू आहे तरी देखील बाधित रुग्णाची संख्या थांबायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीदायक वातावरण पहावयास मिळते. प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन देखील डोळ्यात तेल घालून उपाययोजनाची अंमलबजावणी करत आहे तरी देखिल कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची साखळी तोडू शकले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here