पिकअप जीपने साडेचार वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले…

अनेकांना कट मारला; जीप सोडून चालक पसार..!

अल्ताफ शेख । राष्ट्र सह्याद्री

अकोले : तालुक्यातील सुगाव -कोतुळ रोडवर पिक अप ने साडे चार वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली असुन यावेळी पिक अप चालक पळून गेल्याने गावकरी संतत्प झाले होते.


याबाबत समजलेली माहिती अशी, तालुक्यातील सुगाव येथून कोतुळ ला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने घराजवळ जात असलेल्या साई सतिष शिंदे या साडे चार वर्षाच्या मुलाला पिक अप नं एम एच १७ बी वाय ५६४७ या गाडीवरील चालक याने गाडीने धडक देवून उडवले.

यावेळी चालक मुलाला उडवून पुढे गाडी घेऊन भरधाव वेगाने पळून जात असताना इतर वाहनानाही कट मारल्याचेही प्रत्यक्षदर्शीचे म्हणने आहे. तर पुढे चालक गाडी सोडुन पळून गेला आहे. सदर घटनेने तालुक्यात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर घटनेबाबत अकोले पोलिसांनी सदर पिक अप वरील अज्ञात चालकाविरुद्ध रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने भरधाव वेगात ओव्हरटेक करताना चालवून साई सतीश शिंदे (वय 4 वर्ष) यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे व पळून गेला असल्याचे राहुल बाळासाहेब शिंदे यांच्या
फिर्यादीवरुन. गु.र.न.१८४/२०२०भादवि कलम३०४(अ)२७९,३३७,३३८MVA१३४(अ)(ब)१८४,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो ना एस बी पांडे करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here