उद्धव ठाकरेंकडून भाजपचा विश्वासघात

1

राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा आरोप; सत्तेसाठी दिला धोका

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नवीदिल्ली : महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, हाच कौल होता; मात्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आणि भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या सहा महिन्यांत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पहिलीच एवढी कडवट टीका केली. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नड्डा यांना, काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता; मात्र प्रादेशिक पक्षासोबत निवडणूकग जिंकताना कष्ट घ्यावे लागतात का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली होती; मात्र अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांचे घोडे अडले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी काडीमोड घेतला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आले. ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्य सरकार पडावे, म्हणून भाजपने भरपूर प्रयत्न केले.. भाजप आणि शिवसेनेने निवडणूक एकत्र लढली; मात्र निवडणूक निकालानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या.
नड्डा यांनी भाजपची हार झालेलीच नाही असे म्हटले आहे. सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला आणि ठाकरे यांनी तो केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here